शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भारतीय संगीताला विमानाची दारं खुली करा!, प्रख्यात संगीतकारांची मंत्रीमहोदयांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 08:47 IST

Indian Music : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्री शिंदे यांना भेटून एक आगळीवेगळी ‘तान’ ऐकविण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई : रशियात गेल्यावर रशियन संगीत, तुर्कस्तानमध्ये गेल्यानंतर तुर्की संगीत त्या-त्या विमान प्रवासात ऐकायला मिळते. भारतीय विमानातून प्रवास करताना मात्र परदेशी संगीत का ऐकवायचे..? असा सवाल करीत देशातील मान्यवर संगीतकारांनी नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भारतीय विमानातून भारतीय संगीत ऐकविण्याची साद घातली आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्री शिंदे यांना भेटून एक आगळीवेगळी ‘तान’ ऐकविण्याची इच्छा व्यक्त केली. ती ‘तान’ होती भारतीय संगीतावरील प्रेमाची. ‘अशी सुंदर तान ऐकवायला तुम्ही माझ्याकडे येऊ नका, त्यासाठी मीच तुमच्याकडे येतो’, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील आयसीसीआरचे मुख्यालय गाठले. पाहता पाहता तेथे संगीताची मैफल सजली. पंडित संजीव अभ्यंकर, पंडित शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी पाटील, कौशल इनामदार ही मराठमोळी संगीत क्षेत्रातील नामवंत मंडळी तेथे होती.

त्याचप्रमाणे वसिफोद्दीन डागर, मालिनी अवस्थी, रिटा गांगुली, प्रख्यात संगीतकार अन्नू मलिक यांच्यासारखे संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संगीत दिग्दर्शक अनु मलिक म्हणाले की, विनय सहस्त्रबुद्धे यांनी या कामासाठी जेव्हा हाक दिली त्यावेळी मी धावत गेलो. भारतीय संगीतासाठी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मी जायला तयार आहे. त्यांनी एक अत्यंत चांगली मागणी केली आहे. ती पूर्ण झाली तर भारतीय विमान प्रवासात उत्तम दर्जेदार भारतीय संगीत ऐकायला मिळेल.या मागणीवर आता मंत्री ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

ज्या देशात आपण जातो, त्या देशातले संगीत आपल्याला तिथल्या विमान प्रवासात ऐकायला मिळते. भारतात ही सुविधा आपण का देऊ शकत नाही? प्रत्येक गोष्टीसाठी नियमच केले पाहिजे असे नाही. नियमांपेक्षा भारतावरील आपले प्रेम आणि भारतीय संगीताबद्दलची आस्था या दोन गोष्टी पुरेशा ठराव्यात म्हणून आम्ही ही मागणी केली.- विनय सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, आयसीसीआर

विमान प्रवासात भारतीय संगीत ऐकण्यास मिळणे ही एक अत्यंत अनोखी कल्पना आहे. लोकांनी चांगले संगीत ऐकले तर त्यांची आवड तयार होईल आणि तसेच संगीत वाजविणारेही समाजात तयार होतील.- अनु मलिक, प्रख्यात संगीत दिग्दर्शक 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेairplaneविमान