देवगाव अंगणवाडीत ओटी भरण कार्यक्रम
By Admin | Updated: March 24, 2015 23:41 IST2015-03-24T23:07:07+5:302015-03-24T23:41:26+5:30
देवगाव : येथील अंगणवाडीत गरोदर महिलांचा ओटी भरण (डोहाळे) कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सविता अढांगळे, उपसरपंच लहानू मेमाणे आदि उपस्थित होते.

देवगाव अंगणवाडीत ओटी भरण कार्यक्रम
देवगाव : येथील अंगणवाडीत गरोदर महिलांचा ओटी भरण (डोहाळे) कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सविता अढांगळे, उपसरपंच लहानू मेमाणे आदि उपस्थित होते.
प्रसंगी श्रीमती काल्हे यांनी गरोदर माता, किशोरवयीन मुली, स्तनदा माता यांना मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका जुबेदा काद्री यांनी महिला सबलीकरण, सकस पोषण आहार याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास मनीषा शेटे, योगीता शेटे, योगीता बोचरे, भारती उराडे, छाया गुरव, आयशा तांबोळी, राधिका बोरसे, सरला घेगडमल, शारदा डुकरे, योगीता वाघ, मनीषा बदान, अंजली थोरात तसेच शीतल हंडोरे, वैशाली आहेर, संगीता गायकवाड आदि महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)
---