शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

ॲडव्हान्स पैसे भरणाऱ्यांनाच दिल्लीत खाजगी रुग्णालयात बेड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:23 AM

दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का?

विकास झाडे 

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांची आर्थिक लूट करण्याचा दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी चंग बांधला आहे. भयग्रस्त रुग्णांना लुटणाऱ्या या रुग्णालयांवर केजरीवाल सरकारचा जराही अंकुश नाही.

दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? या गोष्टी आधी तपासल्या जातात. रुग्णाला भरती केले की मग रुग्णालयाचे मीटर सुरू होते. रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईकही रुग्णालयातील बिलावर आक्षेप घेत नाहीत.  अनेक रुग्णांकडे हेल्थ इन्शुरन्स असला तरी त्यांना खासगी रुग्णालयात आगाऊ लाखो रुपये भरावे लागतात. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी लाखो रुपये मागण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांसाठी कोणतेही बंधन नसल्याची व्यथा अ‍ॅड. अभय गुप्ता यांनी सांगितली. उत्तम सेवा आणि आमचा अंकुश असल्याचा केजरीवाल सरकार सातत्याने दावा करीत असले तरी रुग्णालयांकडून केवळ फसवणूक केली जात आहे. जो पैसे अधिक देईल त्यालाच बेड उपलब्ध होऊ शकतो अशी स्थिती आहे. दिल्ली कोरोना अ‍ॅपवर  प्रत्येक दोन तासांनी खासगी रुग्णालयांनी बेडच्या उपलब्धतेची माहिती देणे अत्यावश्यक आहे.  एकाही खासगी रुग्णालयात एकही बेड रिकामा असल्याचे या अ‍ॅपवर दिसून येत नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली