शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

केवळ शिवलिंगासमोर बाळगावी लागणार शांतता! अमरनाथ मंदिरातील मंत्रजागर, बंदी प्रकरणी एनजीटीचे स्पष्टीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 14:57 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता...

जम्मू - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता या प्रकरणात एनजीटीने स्पष्टीकरण दिले असून, अमरनाथमध्ये कोणत्याही प्रकारचे शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले नसून केवळ शिवलिंगासमोर शांतता बाळगण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जाहीर केल्यानंतर भारतीय पक्षाने या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर याबाबत खुलासा करताना राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, "अमरनाथमध्ये कुठलेही शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही.  भक्तगणांना केवळ शिवलिंगासमोर शांतता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. हे बंधन गुहेतील अन्य कुठल्याही भागात लागू नसेल. त्याचबरोबर एक मार्गी रांग कायम ठेवली जाईल." काश्मीरमधील भगवान शंकराच्या अमरनाथ या पवित्र मंदिरात घंटानाद करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी घातल्याचे वृत्त काल आले होते. तो परिसर शांतता क्षेत्र असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा आदेश दिल्याचे या वृत्तात म्हटले होते हिमालयात ३,८८ मीटर उंचीवर असलेल्या या गुंफेमध्ये येणा-या भाविकांना मंत्रघोष व जयजयकारही करू दिला जाऊ नये, असाही आदेश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने अमरनाथ मंदिर प्रशासनास दिला, असल्याचे वृत्त होते.अमरनाथपर्यंत जाण्याचा डोंगर पायवाटेचा मार्ग खडतर असल्याने गर्दी आणि रेटारेटी यामुळे तेथे नेहमीच दुर्घटना होण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी अधिक सुरक्षाउपाय व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, असे न्यायाधिकरणाने याआधी सांगितले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता हे नवे आदेश देण्यात आले होते.काश्मीरमधील वैष्णोदेवी या पवित्र तीर्थस्थानी होणा-या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी न्यायाधिकरणाने गेल्या महिन्यात जाणा-या भाविकांच्या संख्येवर प्रतिदिन ५० हजाराची कमाल मर्यादा घातली होती.

भाविकांच्या सामानावरही निर्बंधभाविकांनी मंदिरात जाण्यापूर्वी मोबाइल फोनसह आपले सामान शेवटच्या चेक पोस्टवर ठेवावे आणि तेथून पुढे एकेरी रांग लावून मंदिरापर्यंत जावे. शेवटच्या चेक पोस्टपाशी भाविकांचे सामान ठेवून घेण्यासाठी प्रशासनाने एखादी खोली बांधावी, असेही न्यायाधिकरणाने सांगितले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduismहिंदुइझमIndiaभारत