बँक चोरीत गॅस सिलेंडर हा एकमेव पुरावा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
बदलापूर : बदलापूर एमआयडीसीतील स्टेट बँकेत रविवारी रात्री झालेल्या जबरी चोरी प्रकरणात केवळ एकच पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरीत लॉकर्स तोडण्यासाठी गॅस कटर वापरण्यात आले होते. त्यामधील गॅस सिलिंडरच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
बँक चोरीत गॅस सिलेंडर हा एकमेव पुरावा
बदलापूर : बदलापूर एमआयडीसीतील स्टेट बँकेत रविवारी रात्री झालेल्या जबरी चोरी प्रकरणात केवळ एकच पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरीत लॉकर्स तोडण्यासाठी गॅस कटर वापरण्यात आले होते. त्यामधील गॅस सिलिंडरच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारची सुीची संधी साधून रविवारी रात्री काही चोरटे स्टेट बँकेत घुसले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेतील लॉकर्स फोडले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, गॅस सिलेंडर सापडला. हा सिलिंडर नवी मुंबईचा असून तो कोणाच्या नावावर आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेराचे कनेक्शन तोडण्याआधी चोरट्यांचे जे चित्रण झाले, त्यावरुन त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. तसेच एमआयडीसी परिसरात ज्या कंपन्यांसोमोर सीसीटीव्ही आहेत त्यातील चित्रीकरणावरुन चोरट्यांच्या गाडीचा तपास करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)