शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 20:11 IST

"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे.

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या राज्यांपैकी राजस्थान, मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बंपर विजय मिळाला आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभिनंदन करत, "देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे," असे जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. ते दिल्ली येथील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

नड्डा म्हणाले, "देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. असे आपले यशस्वी पंतप्रधान आहेत. या निवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदीवासी बंधी. यांना कुणी सन्मानाने मुख्य प्रवाहात आणू शकतो, तर ते दुसरे  तिसरे कुणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. यावर या सर्वांना विश्वास आहे."

देशात केवळ एकच गॅरंटी -"देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी आहे. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. हे निकाल आणखी एक संदेश देतात, ती म्हणजे, मोदी है तो मुमकीन हे. हेही आपल्याला स्पष्टपणे दिसते," अशा शब्दात नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशन्सा केली.

मोदीचा विकासाचा मुद्दा ठरला भारी - नड्डा म्हणाले, "मित्रांनो, या निवडणुकीतून आणखी एक संदेश मिळतो, इंडिया अलायन्सने ज्या पद्धतीने जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने समाज खंडित करण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि तुष्टिकरणाचे राजकारण पुढे नेण्याचे काम केले. यावर मोदीजींच्या विकासाचा मुद्दा भारी ठरला आहे. हेही आपण लक्षात ठेवायला हवे. देशाने विकासाला समोर ठेवून या निवडणूक निकालांवर मोहर उमटवली आहे."

...पण  हे विसरतात की, देशाचे पंतप्रधान औबीसी समुदायातील आहेत -इंडिया अलायन्सने ओबीसीच्या घोषणा देत आहेत. पण  हे विसरतात की, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औबीसी समुदायातील आहेत. सर्वांच्या विकासाचा प्रण करून, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या पुढे नेण्याचे काम केले आहे. मात्र, काँग्रेसच्या लोकांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींसंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले, तेव्हा त्यांना कळले नाही का, की मोदीजींसाठी वापरलेले अपशब्द म्हणजे, ओबीसी समाजावर भाष्य करण्यासारखे आहे? असा सवालही यावेळी नड्डा यांनी केला.

रणनीती पडद्याआडचा विषय असतो -भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, या यशासाठी मी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. याच बरोबर मी आमच्या लाखो कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. मला पत्रकार विचारत होते की, रणणिती काय आहे? मी म्हणत होतो, रणनीती पडद्याआडचा विषय असतो. ती वेळेवरच समोर येते. माझ्या कार्यकरत्यांनी ही रणनीती अगदी योग्य पद्धतीने अंममलबजावणी केली. त्यांचे मोठे योगदान आहे. त्यासाठीही मी त्यांचे अभिनंदन करतो. आम्हाला समाजाच्या सर्वस्थरांतून मतदान झाले आहे, असेही जपी नड्डा यांनी म्हणाले.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३