शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देशात काय एकटे शेतकरीच आत्महत्या करतात का? भाजपाच्या मंत्र्याचा उर्मट सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:59 IST

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता.

भोपाळ: कर्जमाफी आणि शेतकरी समस्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारची सातत्याने कोंडी होत असतानाच भाजपच्याच एका मंत्र्याच्या वक्तव्यामुळे हा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील भाजपाचे आमदार व मंत्री बाळकृष्ण पाटीदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी आत्महत्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, देशात आत्महत्या कोण करत नाही? व्यापारी आत्महत्या करतात, पोलीस आयुक्तही आत्महत्या करतात. त्यामुळे ही संपूर्ण देशातील समस्या आहे. फक्त आत्महत्या करणाऱ्यालाच त्याच्यामागील खरे कारण माहिती असते. आपण लोक केवळ त्याचा अंदाज लावत असोत, असे बाळकृष्ण पाटीदार यांनी म्हटले. पाटीदार यांच्या या विधानामुळे शिवराजसिंह चौहान यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारामुळे देशभरातील जनमत प्रक्षुब्ध झाले होते. त्यानंतर भाजपच्या मंत्र्याकडून अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करण्यात आल्याने पक्षाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींचा हा सल्ला भाजपच्या नेत्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाही. 

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNarendra Modiनरेंद्र मोदी