केवळ निवडणूक लाभासाठी भाजपा, संघाचा ‘राम नामाचा जप’ - नितीशकुमार

By Admin | Updated: December 7, 2015 08:59 IST2015-12-07T01:39:47+5:302015-12-07T08:59:46+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

Only BJP for the electoral gains, the team's 'Ram Namacha chant' - Nitish Kumar | केवळ निवडणूक लाभासाठी भाजपा, संघाचा ‘राम नामाचा जप’ - नितीशकुमार

केवळ निवडणूक लाभासाठी भाजपा, संघाचा ‘राम नामाचा जप’ - नितीशकुमार

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.
केवळ राजकीय लाभासाठी भाजप व रा. स्व. संघाने राम नामाचा जप चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला. संघ परिवार यासंदर्भात खरोखर गंभीर असेल, तर त्यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याची निश्चित तारीख घोषित करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

Web Title: Only BJP for the electoral gains, the team's 'Ram Namacha chant' - Nitish Kumar