ओटे दिलेे तरच गोलाणीत स्थलांतर बळीराम पेठ हॉकर्सची नाराजी: आयुक्तांकडून चुकीची माहिती
By Admin | Updated: April 15, 2016 00:42 IST2016-04-15T00:42:21+5:302016-04-15T00:42:21+5:30
जळगाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे.

ओटे दिलेे तरच गोलाणीत स्थलांतर बळीराम पेठ हॉकर्सची नाराजी: आयुक्तांकडून चुकीची माहिती
ज गाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे. बळीराम पेठेतील अतिक्रमणे काढणे व हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी बुधवारी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतली होती. या बैठकीनंतर बळीराम पेठेतील हॉकर्सना गोलाणीत जागा आखून देण्यात येणार असून हॉकर्सने यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. या संदर्भात आज हॉकर्स संघटनेने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन आयुक्तांचा प्रस्ताव नाकारला आहे. न्यायालयात दावा प्रलंबितनिवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रत्यक्षात आम्ही कोर्टाच्या आदेशानेच व निकालानंतर देण्यात येणार्या जागेवर स्थलांतरित होणार आहोत. असे असताना महापालिकेकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे.गोलाणीत ओटे शिल्लक नाही गोलाणी मार्केटमधील रिकाम्या ओट्यांची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली असता तेथे ओटे वा गाळे शिल्लक नाहीत असे कळविण्यात आले. महापालिका ओट्यांच्या खाली फुटपाथच्या जागेवरती तात्पुरती आखणी करून ओटे तयार करीत असून त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. आयुक्तांनी पर्यायी जागेची विचारणा केली असता आम्ही गोलाणीत ओटे द्या ते शक्य नसल्यास बळीराम पेठेतच आतील गल्लीमध्ये व्यवसाय करू द्यावा, साने गुरुजी रुणालयाच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करू द्यावा, जुन्या नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करू द्यावा अशी मागणी या हॉकर्सने केली आहे. गोलाणीत तुर्तास स्थलांतरित होण्याची कोणतीही तयारी आम्ही दर्शविली नसल्याचे भाजीपाला विक्रेता असो.च्या अध्यक्षा शकुंतला पाटील व अन्य पदाधिकार्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.