मोदींजवळ फक्त ४७०० रुपये रोख
By Admin | Updated: February 2, 2016 02:53 IST2016-02-02T02:53:03+5:302016-02-02T02:53:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याजवळ मोठी रोख रक्कम बाळगत नाहीत असे दिसते; परंतु त्यांच्या एकूण मालमत्तेत वाढ होऊन ती १.४१ कोटीवर पोहोचली आहे.

मोदींजवळ फक्त ४७०० रुपये रोख
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याजवळ मोठी रोख रक्कम बाळगत नाहीत असे दिसते; परंतु त्यांच्या एकूण मालमत्तेत वाढ होऊन ती १.४१ कोटीवर पोहोचली आहे. त्यात मोदींनी १३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या निवासस्थानाचा समावेश आहे आणि त्याची किंमत आता २५ पटीने वाढली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मोदींच्या मालमत्तेचा तपशील नुकताच जाहीर केला. त्यानुसार मागील वित्त वर्षाच्या अखेर मोदींजवळ ४७०० रुपये रोख रक्कम होती. १८ आॅगस्ट २०१४ च्या मध्यात हा आकडा ३८७०० रुपये होता. तथापि याच काळात मोदींच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची एकूण किंमत १,२६,१२,२८८ रुपयांवरून वाढून ती ३१ मार्च २०१५ रोजी १,४१,१४,८९३ रुपये झाली आहे. त्यांच्याजवळ १.१९ लाख रुपये किमतीच्या आणि ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या तेवढ्या आहेत. ही सर्व माहिती पीएमओच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ८१९०८८१९०८ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून तुम्ही केव्हाही ‘मन की बात’ ऐकू शकता, असे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासातच या क्रमांकावर चार लाखांच्या वर मिस्ड कॉल्स आले. या कार्यक्रमाचे प्रसारण संपल्यावर पहिल्या तासाभरात २५,००० पेक्षा जास्त कॉल्स आले. हा आकडा अजूनही वाढतोच आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार मन की बात कार्यक्रम फार लवकर प्रसिद्ध झाला. पण इंटरनेट कनेक्टिव्हिटीमधील अडचणींमुळे गावांमध्ये लोक तो नंतर ऐकू शकत नव्हते. त्यामुळे मोबाईलवर मिस्ड कॉल देऊन ऐकण्याचा पर्याय देण्यात आला.