तक्रार स्वीकारण्यासाठी ऑनलाईन सेवा
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30

तक्रार स्वीकारण्यासाठी ऑनलाईन सेवा
>नागपूर : महापालिकेने जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी इंटरनेटवर डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एनएमसी नागपूर गव्हर्नमेन्ट डॉट इन या संकेत स्थळावर नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. या स्तंभातील तक्रार नोंदवा ही वेब लिंक मराठी भाषेतील वेबपेजवर तसेच सिटीजन ऑनलाईन सर्व्हिस या कॉलम अंतर्गत तक्रार नोंदविता येते. तक्रार जमा केल्यानंतर तक्रारक र्त्याला तक्रारीचा एक क्रमांक मिळतो. तो त्यांनी लिहून ठेवावा. वेबपेजवर हा क्रमांक टाकल्यानंतर तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली(प्रतिनिधी)