भारतीय रेल्वेत प्रथमच आॅनलाइन नोकरभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 01:26 IST2015-08-29T01:26:07+5:302015-08-29T01:26:07+5:30
रेल्वे भरती मंडळ प्रथमच अभियंत्यांच्या तीन हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेत आहे. २६ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत सिनिअर सेक्शन इंजिनीअर्स आणि

भारतीय रेल्वेत प्रथमच आॅनलाइन नोकरभरती
नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळ प्रथमच अभियंत्यांच्या तीन हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेत आहे.
२६ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत सिनिअर सेक्शन इंजिनीअर्स आणि ज्युनिअर इंजिनीअर्सच्या ३२७३ पदांसाठी पहिल्यांदा अखिल भारतीय आॅनलाइन संगणकआधारित परीक्षेचे आयोजन होत आहे. या परीक्षेसाठीचे अर्जही आॅनलाइन पद्धतीने मागवण्यात आले होते. सुमारे १८ लाख उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले आहेत.
या आॅनलाइन भरतीमुळे परीक्षेत अधिक पारदर्शकता व निष्पक्षता येईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या २४२ शहरांत ही परीक्षा आयोजित केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)