शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारचे सर्जिकल स्ट्राइक, 357 वेबसाइट केल्या ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 22:11 IST

जवळपास 700 विदेशी ई-गेमिंग कंपन्या DGGI च्या रडारवर आहेत.

Online Gaming : भारतात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी परदेशातून कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या 357 वेबसाइट ब्लॉक केल्या. यासोबतच सुमारे 2,400 बँक खातीही जप्त करण्यात आली आहेत. तसेच, मंत्रालयाने लोकांना अशाप्रकारच्या गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्यापासून सावध केले. मंत्रालयाने म्हटले की, बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनी या प्लॅटफॉर्मची जाहिरात केली, तरी तुम्ही याच्या भरीस पडू नका.

जवळपास 700 विदेशी ई-गेमिंग कंपन्या DGGI च्या रडारवर आहेत. याचे कारण म्हणजे, त्यांनी यासाठी कुठलीही नोंदणी केलेली नाही. तसेच, या कंपन्यांकडून GST ची चोरीही केली जात आहे. या विदेशी कंपन्या बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून व्यवहार करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, DGGI ने एकूण 2,400 बँक खाती जप्त केली आणि सुमारे 126 कोटी रुपये गोठवले.

गेमिंग व्यवसाय 7.5 अब्ज रुपयांचा एका अहवालानुसार, भारतीय रिअल मनी गेमिंग (आरएमजी) क्षेत्र आर्थिक वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंत 28 टक्के वार्षिक वाढीसह जागतिक बाजारपेठेतील अग्रणी बनले आहे. पुढील पाच वर्षांत या क्षेत्राचा महसूल US$ 7.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या अशा फसवणुकीच्या अॅप्सपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

गेमिंगसाठी कठोर कायदे आवश्यक डिजिटल इंडिया फाऊंडेशनचे सह-संस्थापक म्हणाले की, बेकायदेशीर ऑपरेटर्सवर अंकुश ठेवण्यासाठी नियामक प्रयत्न असूनही अनेक प्लॅटफॉर्म मिरर साइट्स, बेकायदेशीर ब्रँडिंग आणि विसंगत आश्वासने लोकांची फसवणूक करतात. यावर कठोर देखरेख आणि अंमलबजावणीची तातडीची गरज आहे. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारcyber crimeसायबर क्राइमGSTजीएसटी