पाकच्या गोळीबारात एक महिला जखमी
By Admin | Updated: October 31, 2016 17:19 IST2016-10-31T17:02:30+5:302016-10-31T17:19:31+5:30
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताने सीमा नियंत्रण रेषेजवळ (LOC) केलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली असून तिला

पाकच्या गोळीबारात एक महिला जखमी
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि.31 - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताने सीमा नियंत्रण रेषेजवळ (LOC) केलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून सतत होणा-या हल्ल्यांमुळे सीमा नियंत्रण रेषेजवळील (LOC) गावात राहणा-या नागरिकांचे जगणं कठीण झालं आहे. सोमवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली. तिला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहे. तसेच, याआधी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एक भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला, तर मेंढर सेक्टरमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने सीमेजवळच्या अनेक गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
One woman injured in Ceasefire violation by Pakistan in Rajouri Sector (J&K), taken to hospital pic.twitter.com/jYAKkqtXUk
— ANI (@ANI_news) October 31, 2016