जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता
By Admin | Updated: February 24, 2016 09:23 IST2016-02-24T09:00:55+5:302016-02-24T09:23:36+5:30
जे लोक जन गण मन व वंदे मातरम म्हणत नाहीत त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकार नाही, असे विधान भाजपा नेता सीपी सिंह यांनी केले

जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २४ - जे लोकं भारतात राहतात, या देशाचे अन्न खातात त्यांनी 'वंदे मातरम' आणि ' जन गण मन' म्हटलेच पाहिजे, आणि जे असं करणार नाहीत त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकारच नाही,' असे वादग्रस्त विधान झारखंडमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते व शहर विकासमंत्री सीपी सिंह यांनी केले आहे.' ते विधानसभेच्या परिसरात बोलत होते.
जेएनयूमध्ये (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) देशविरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांना पाठिबा दर्शवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारण करत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला. राहुल गांधी यांनी देशद्रोह्यांच्या बाजून उभं राहून देशद्रोहाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
' जी व्यक्ती वंदे मातरम् वा जन गण मन म्हणू इच्छित नाही, त्या व्यक्तीला भारतीय म्हणवण्याचा अधिकार नाही. तुम्ही ज्या देशाचे अन्न खाता, तिथे खुलेपणे जगता, त्याच देशाला शिव्या कशा देऊ शकता? हा देशद्रोहच नव्हे का?' असे सवाल सिंह यांनी विचारले.