शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींसाठी दहा लाख मास्क; जेईई, नीटची परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:23 IST

जेईई (मेन) परीक्षेसाठी कोरोना साथीच्या आधी एनटीएने ५७० परीक्षा केंद्रे सज्ज ठेवली होती. मात्र, त्यात आता वाढ होऊन ६६० परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाची साथ असली तरी जेईई (मेन) व नीटची परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने परीक्षार्थींच्या आरोग्य सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या, १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर व ६६०० लिटर हँड सॅनिटायझर आदी गोष्टी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून घेतल्या आहेत.

अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जेईई (मेन) ही आॅनलाईन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत, तर वैद्यकीय, तसेच दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी नीट ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय ६६०० स्पंज, ३,३०० स्प्रे बाटल्या विकत घेण्यात आल्या असून, परीक्षेच्या दिवसांत ३,३०० स्वच्छता कर्मचारी परीक्षा केंद्रांवर सज्ज असतील. जेईई (मेन) या परीक्षेला सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी बसणार असून, तिथे १.१४ लाख जण पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी एनटीएने जय्यत तयारी केली आहे. जेईई (मेन) व नीट परीक्षा कोरोनाच्या काळात घेण्यास काही राज्य सरकारांनी तीव्र विरोध दर्शविला होता.फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनाजेईई (मेन) व नीट परीक्षांच्या दर ३० परीक्षार्थींमागे २ पर्यवेक्षक ठेवण्यात आले होते. आता हेच प्रमाण १५ परीक्षार्थींपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. आता पर्यवेक्षकांची संख्या वाढवून ती १.४ लाख करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी २० मिनिटांच्या कालावधीत किमान ४० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा