एकाची जन्मठेप कायम, तिघे निर्दोष
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:07+5:302015-04-04T01:55:07+5:30
हायकोर्ट : बुलडाणा जिल्ातील हत्याप्रकरण

एकाची जन्मठेप कायम, तिघे निर्दोष
ह यकोर्ट : बुलडाणा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलडाणा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात एका आरोपीची जन्मठेप कायम ठेवली तर, तीन आरोपींना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिलेत.रामकृष्ण बबन वानखडे (५७) असे जन्मठेप कायम असलेल्या आरोपीचे नाव असून निर्दोष आरोपींमध्ये विजय ऊर्फ विजू ओंकार वानखडे (३२), राजू ओंकार वानखडे (३२) व श्रीकृष्ण बबन वानखडे (६०) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी लखनवाडा, ता. खामगाव येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव शेषराव होते. शेषरावच्या मुलीने आरोपी रामकृष्णचा मुलगा विकाससोबत प्रेमविवाह केला. यामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले होते. ९ एप्रिल २०११ रोजी विकासने शेषरावला मामा म्हणून आवाज दिला. यामुळे शेषरावच्या पत्नीने रामकृष्णच्या घरी जाऊन जाब विचारला. यावरून आरोपींनी शेषरावची हत्या केली. रामकृष्णने कुऱ्हाडीने वार केले तर, अन्य आरोपींनी काठ्यांनी मारहाण केली होती.१२ ऑक्टोबर २०१२ रोजी खामगाव सत्र न्यायालयाने आरोपी रामकृष्णला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप तर, अन्य आरोपींना कलम ३२४ (शस्त्राने जखमी करणे) अंतर्गत एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता रामकृष्णचे अपील फेटाळले तर, अन्य आरोपींचे अपील मंजूर केले. हिवरखेड पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.