व्हिस्टा कारच्या धडकेमुळे एक ठार
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:50+5:302015-02-11T23:19:50+5:30
व्हिस्टा कारच्या धडकेमुळे एक ठार

व्हिस्टा कारच्या धडकेमुळे एक ठार
व हिस्टा कारच्या धडकेमुळे एक ठारनागपूर : व्हिस्टा कारने स्कूटरला धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता लाल गोडाऊन ग्रामीण पोलीस मुख्यालय रस्त्यावर घडली. मनजितसिंग कलसी हे आपली स्कूटर क्रमांक एम.एच. ३१, क्यु-६४९ वरून जात होते. स्कुटरच्या मागील सीटवर देवेंद्र माधव कावडे (३९) रा. बाळाभाऊपेठ, विठोबा आखाड्याजवळ पाचपावली हे बसून होते. कामठी मार्गावर जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल गोडाऊन रस्त्यावर व्हिस्टा कार क्रमांक डी. एन. ०९, ई-२८९९ च्या चालकाने त्यांच्या स्कुटरला मागून जोरात धडक दिली. यात मनजितसिंग कलसी यांचा मृत्यू झाला तर देवेंद्र कावडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. जरीपटका पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ............