मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीने धडक दिल्याने एक जण ठार
By Admin | Updated: March 3, 2015 12:37 IST2015-03-03T12:37:47+5:302015-03-03T12:37:47+5:30
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीने धडक दिल्याने पदचा-याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीने धडक दिल्याने एक जण ठार
>ऑनलाइन लोकमत
करनाल, दि. ३ - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीने धडक दिल्याने पदचा-याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी रात्री करनाल मुख्यमंत्री चंडिगढहून दिल्लीला जात असताना हा करनाल पासून २० किमी अंतरावर तारौरी येथे हा अपघात घडला. एक पदचारी रस्ता ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीने या व्यक्तीला धडक दिली असता त्या व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीतील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या अपघातात जीव गमवलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस अधीक्षक अभिषेक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात राष्ट्रीय महामार्ग एक वर झाला आहे.