जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू तर 3 जखमी
By Admin | Updated: March 3, 2017 13:47 IST2017-03-03T13:38:44+5:302017-03-03T13:47:34+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केला

जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू तर 3 जखमी
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केला. मुरान चौक येथे दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसात झालेला हा दुसरा हल्ला आहे. जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
गेल्याच आठवड्यात शोपिअन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्त पथकावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन लष्कर जवान शहीद झाले होते, तर तीन जण जखमी झाले होते. चार आठवड्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली ही पाचवी चकमक होती.
#UPDATE Pulwama(J&K): One local killed and three people including one CRPF jawan injured
— ANI (@ANI_news) March 3, 2017