टेम्पाच्या टायरखाली चिरडल्याने एक ठार
By Admin | Updated: November 4, 2015 00:24 IST2015-11-03T23:45:45+5:302015-11-04T00:24:37+5:30
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजाराशेजारी एका टेम्पोच्या टायरखाली चिरडल्याने एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टेम्पाच्या टायरखाली चिरडल्याने एक ठार
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजाराशेजारी एका टेम्पोच्या टायरखाली चिरडल्याने एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळ बाजाराच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर टेम्पो क्रमांक एम. एच. ०७- १६८७ चा चालक आपले वाहन मागे पुढे करत असताना, टेम्पोच्या डाव्या बाजूच्या टायरखाली चिरडल्यामुळे एका ४० वर्षीय पुरुष जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रेतासाठी उत्तरीय तपासणीसाठी गांधीचौक पोलिसांनी शासकीय वैद्यकीय रुगणालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मृत व्यक्तिच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ओळख पटविण्याचे प्रयत्न...
या अपघातातील ४० वर्षीय पुरुष जातीच्या व्यक्तिचे डोकेच टायरखाली चिरडल्यामुळे चेहरा स्पष्ट ओळखता येण कठीण बनले आहे. परिणामी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. चेहाराच विदु्रप झाल्यामुळे ओळख कशी पटवायची हेच आव्हान आता पोलिसांसमोर आहे.