जमिनीच्या वादातून मायलेकींवर हल्ला एकीचा मृत्यू : कातकरी कुटुंबातील दोघांना अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:38+5:302015-02-14T23:51:38+5:30
नवी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून मायलेकींवर हल्ला एकीचा मृत्यू : कातकरी कुटुंबातील दोघांना अटक
न ी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वावंजे गाव येथे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेथे राहणार्या मीराबाई भगत (५८) यांच्या घरावर दोघांनी हल्ला केला. त्यांनी घरामध्ये बसलेल्या मीराबाई यांच्यासह त्यांची मुलगी सुरेखा भगत (३६) यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरेखा हिचा जागीच मृत्यू झाला. तर मीराबाई यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भगत यांच्या राहत्या झोपडीच्या मागच्या बाजूने आत प्रवेश करून त्याच परिसरातील कातकरी समाजाच्या व्यक्तींनी हा हल्ला केला होता. त्यानुसार कैलास पवार आणि पंढरी पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त संजयसिंह येणपुरे यांनी सांगितले. आपला दावा असलेल्या भूखंडावर मीराबाई भगत यांनी झोपडी उभारल्याचे पवार कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यावरून भगत आणि पवार कुटुंबात वाद सुरू होता. याच वादातून मीराबाई भगत यांच्यावर हल्ला झाल्याचेही उपआयुक्त येणपुरे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)