बाभूळगावनजिक अपघातात एक ठार
By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:29+5:302015-11-15T23:14:29+5:30
अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहॉगीरनजिक अपघातात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मो. सुफिया हुसेन असे मृतकाचे नाव आहे.

बाभूळगावनजिक अपघातात एक ठार
अ ोला - राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहॉगीरनजिक अपघातात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मो. सुफिया हुसेन असे मृतकाचे नाव आहे.आकोट फैलमधील रहिवासी मो. सुफीया हुसेन हे एम एच ३१ ई ६२५१ क्रमांकाच्या स्कूटरने बाभूळगाववरून जात असताना त्याला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात मो. सफिया हुसेन यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती तातडीने मार्गी लावण्यासाठी धावपळ केली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.