दोन अपघातांत एक ठार, तीन जखमी

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:04+5:302015-02-14T23:52:04+5:30

ठाणे : भाईंदर येथील जयसिंग राठोड हे कुटुंबासह रिक्षाने ठाण्यात येत असताना त्यांच्या रिक्षाला घोडबंदर रोडवर शुक्रवारी दुपारी डम्परने जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी होऊन तिघे जखमी झाले. तसेच रिक्षाचे नुकसान झाल्याप्रकरणी डम्परचालक बळीराम सूर्यवंशी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसर्‍या घटनेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालक सनी खेडकरला अटक करण्यात आली आहे.

One killed and three injured in two accidents | दोन अपघातांत एक ठार, तीन जखमी

दोन अपघातांत एक ठार, तीन जखमी

णे : भाईंदर येथील जयसिंग राठोड हे कुटुंबासह रिक्षाने ठाण्यात येत असताना त्यांच्या रिक्षाला घोडबंदर रोडवर शुक्रवारी दुपारी डम्परने जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी होऊन तिघे जखमी झाले. तसेच रिक्षाचे नुकसान झाल्याप्रकरणी डम्परचालक बळीराम सूर्यवंशी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसर्‍या घटनेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालक सनी खेडकरला अटक करण्यात आली आहे.
जयसिंग, पत्नी कुसुम आणि मुलगा निकेतन अशी जखमींची नावे आहेत. ते भाईंदरमधील साईशांती सोसायटीत राहत असून घोडबंदर रोडने यशोधननगर येथे चालले होते. याचदरम्यान सिनेवंडर मॉलसमोर भरधाव वेगाने आलेल्या डम्परने दिलेल्या धडकेत रिक्षा पलटी झाली. या घटनेनंतर पळ काढणार्‍या डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
दुसर्‍या घटनेत, शास्त्रीनगर येथील बबन दवंडे हे कुटुंबासह लग्नासाठी गावावरून आले होते. याचदरम्यान, ते कॅडबरी नाक्यावर उतरून पायी घरी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर शनिवारी पहाटे चालकाला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: One killed and three injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.