वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:15+5:302015-02-18T00:13:15+5:30
वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू

वर्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू
व ्धा नदीत नाव उलटून एकाचा मृत्यूबल्लारपूर (जि़चंद्रपूर) : वर्धा नदीत नाव उलटल्याने हैदराबाद येथून बल्लारपूर येथे नातेवाईकाकडे आलेल्या एकाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. तर दहा वर्षीय मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध घेतला जात आहे. इतर चार जणांना वाचविण्यात यश आले. सदर घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथे घडली.दर्शन यादगिरी गोल्लू (१८) असे मृताचे नाव असून, बेपत्ता असलेली हैदराबाद येथील स्नेहा अजय निलम (१०) हिचा शोध घेतला जात आहे. नारायणगुडा येथील रहिवासी अजय निलम, रोशन नातर, सानिया निलम, प्रशांत नालयम, दर्शन यादगिरी व स्नेहा निलम हे बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वॉर्डात राहणार्या नातेवाईकांकडे आले होते. महाशिवरात्री असल्याने ते वर्धा नदी घाटावर शिवमूर्ती पूजेसाठी गेले. पूजेनंतर त्यांनी नावेत बसून नदीत सैर करण्याचा बेत आखला. नाव चालक सुखलाल मोरे यांनी सहा जणांना नावेत बसवून नाव हाकलली. मात्र, नाव खोल पाण्यात गेल्यानंतर उलटली. यात नावेमध्ये बसलेले सर्व जण पाण्यात बुडाले. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड करताच नदी घाटावर असलेल्या बलबीर निशाद, रामधनी निशाद व राकेश निशाद तिघांनी पाण्यात उडी घेऊन अजय, सानिया, प्रशांत व सुखलाल यांना बाहेर काढले. मात्र, स्नेहा व दर्शन हे हाती लागू शकले नाही. (शहर प्रतिनिधी)