शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा एक निर्णय अन् काँग्रेस भडकली, पण का? मोदी सरकारकडे केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:10 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर टीका करत, ते 'अस्वीकार्य' असल्याचे रमेश यांनी म्हटेल आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाजा पट्टीसंदर्भात केलेल्या एका विधानावरून काँग्रेस नेते जयराम रमेश भडकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर टीका करत, ते 'अस्वीकार्य' असल्याचे रमेश यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, "अमेरिका, युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीचा ताबा घेईल, तिचा आर्थिक पुनर्विकास करेल आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन करेल," अशा आशयाचे विधान ट्रम्प यांनी केले होते. ट्रम्प यांच्या याच विधानावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले, जय राम रमेश? -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटेल आहे, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गाझाच्या भविष्यासंदर्भात केलेले विधान अजब, धोकादायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. केवळ दोन-राज्यांचा पर्यायच पॅलेस्टिनी नागरिकांचे स्वातंत्र्य आणि त्यांची सन्मानाने जगण्याची कायदेशीर आकांक्षा पूर्ण करू शकतो, तसेच इस्रायलची सुरक्षितताही सुनिश्चित करू शकतो. हाच पश्चिम आशियातील शाश्वत शांततेचा एकमेव मार्ग आहे. या प्रकरणात, मोदी सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करायला हवी," असेही रमेश यांनी म्हटले आहे.

कायम म्हणाले होते ट्रम्प? -ट्रम्प म्हणाले होते, "अमेरिका गाझा पट्टीचा ताबा घेईल, तेथील धोकादायक शस्त्रास्त्रे नष्ट करेल, उद्ध्वस्त इमारती हटवून या भागाच्या आर्थिक विकासासाठी काम करेल आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन करेल." ट्रम्प यांच्या या घोषणेवर, जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

हमासचा वरिष्ठ अधिकारी सामी अबू जुहरी म्हणाला, "गाझाचा ताबा घेण्याची ट्रम्प यांची इच्छा हास्यास्पद आहे आणि अशा कोणत्याही विचाराने या भागात आगडोंब उसळू शकतो. गाझातील लोक, अशा कोणत्याही योजनेला यशस्वी होऊ देणार नाहीत." 

टॅग्स :congressकाँग्रेसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPalestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायलAmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धNarendra Modiनरेंद्र मोदी