शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 23:42 IST

शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेश- शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची टीम पोहोचली आहे. बचाव पथकानं पोलिसांच्या मदतीनं 15 लोकांना ढिगा-याखालून बाहेर काढलं आहे. परंतु या दरम्यान तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. आताही या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक मजूर दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीत जवळपास 60 मजूर काम करत होते. बचाव कार्याला गती प्राप्त झाली असून, लखनऊमधून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवान्या झाल्या आहेत. इमारतीच्या बाहेरील भिंती तोडून मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.घटनास्थळी शाहजहांपूरचे डीएम आणि एसपी पोहोचले आहेत. निर्माणाधीन इमारतीमध्ये मोठा हॉल होता. त्याला पिलरचा आधार नव्हता. तो ढासळल्यानंतरच पूर्ण इमारती कोसळली आहे. आम्ही इमारतीच्या ढिगा-याखाली दबले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. इमारत कोसळल्यानंतर ठेकेदार फरार झाला आहे. तर आजूबाजूची माणसेही बचावकार्याला मदत करत आहेत. या ढिगा-याखाली अनेक मजूर दबले गेल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ही घटना आरसी मिशन इथल्या बाबा हॉटेलजवळ घडली आहे. इथे एका डिग्री कॉलेजसाठीच्या इमारतीची बांधणी सुरू होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश