शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस पर्यटक भारतात शौचालयं पाहायला येतील- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 15:18 IST

पंतप्रधान मोदींचा हरयाणात महिलांशी संवाद

कुरुक्षेत्र: युरोपातील एका ठिकाणी पर्यटक घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. एक दिवस असाही येईल की परदेशी पर्यटक भारतातील शौचालयं पाहण्यासाठी येतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. ते हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये बोलत होते. एक दिवस देशातील शौचालयं इतकी स्वच्छ आणि सुंदर होतील की ती पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक गर्दी करतील, असं मोदी म्हणाले. स्वच्छ शक्ती 2019 या कार्यक्रमातून मोदींनी आज महिलांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी हरयाणाच्या कुरुक्षेत्रमधून राज्यातील भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. मोदींचा दौरा राजकीय नसल्याचं राज्य सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य करत प्रचाराचं बिगुल फुंकलं. महिलांना संबोधित करताना पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचं यश अधोरेखित केलं. 'मी लाल किल्ल्यावरुन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली, त्यावेळी विरोधकांनी माझी खिल्ली उडवली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही,' असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. एक दिवस देशातील शौचालयं पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येतील, असं मोदी म्हणाले. 'युरोपात एक ठिकाण आहे. त्या भागातील घरांच्या भिंती अतिशय सुंदर आहेत. त्यांच्यावरील रंगरंगोटी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक गर्दी करतात. एक दिवस असाही येईल, जेव्हा हिंदुस्तानाच्या गावातील शौचालयं पाहण्यासाठी पर्यटक येतील,' असं मोदींनी म्हटलं. या कार्यक्रमाला नायजेरियाहून आलेले पाहुणे उपस्थित होते. त्यांचं मोदींनी स्वागत केलं. 'स्वच्छ भारत योजनेला मिळालेलं यश पाहण्यासाठी तुम्ही इथं आलात, अशी माहिती मला मिळाली. असंच अभियान तुम्हाला नायजेरियात राबवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या अभियानाला यश मिळो,' असं पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान