एक दिवस प्रणव आमच्यासोबत खेळेल - अजिंक्य
By Admin | Updated: January 5, 2016 18:40 IST2016-01-05T18:25:59+5:302016-01-05T18:40:21+5:30
वातावरण, मैदान आणि वय या बाबी लक्षात घेता प्रणवने खरोखर अतुलनीय कामगिरी केली आहे. तो एक खास मुलगा असून, ही दुर्मिळ खेळी आहे अशा शब्दात धोनीने प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले.

एक दिवस प्रणव आमच्यासोबत खेळेल - अजिंक्य
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांची खेळी करुन जागतिक विक्रम करणा-या प्रणव धनावडेवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रणवला सचिन तेंडुलकर पाठोपाठ हरभजन सिंग, अजिंक्य रहाणे आणि भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शाब्बासकी दिली आहे.
इतक्या धावा करणे हा विनोद नाही. वातावरण, मैदान आणि वय या बाबी लक्षात घेता प्रणवने खरोखर अतुलनीय कामगिरी केली आहे. तो एक खास मुलगा असून, ही दुर्मिळ खेळी आहे अशा शब्दात धोनीने प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले.
अजिंक्यने प्रणवच्या खेळीचे विशाल असे वर्णन करुन एकदिवस तो भारतासाठी खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यक्तीगत नाबाद १००९ धावा करणे ही मोठी कामगिरी आहे. एकदिवस तो आमच्यासोबत खेळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता फक्त त्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रीत करावे असे अजिंक्यने म्हटले आहे.