शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादचा मजूर व्हिजलन्सच्या रडारवर; खात्यातून वर्षभरात १ कोटीहून अधिकचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 23:06 IST

मजुरी करणाऱ्या तरुणाच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; तरुण पूर्णत: अनभिज्ञ

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबादमधील एका गरीब तरुणाच्या खात्यातून एक कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. प्रकरण पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित आहे. खातेधारक सोनू कुमार रिसियप गावचा रहिवासी असून सध्या तो नागपुरात मजुरीचं काम करतो. गेल्या वर्षभरात त्याच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. 

दिल्लीतल्या दक्षता पथकानं बँकेला तरुणाच्या खात्यातून होत असलेल्या मोठ्या व्यवहारांची सूचना दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी याची माहिती सोनू कुमारला दिली. आपल्याला या व्यवहाराची कोणतीही कल्पना नसल्याचं सोनूनं सांगितलं. यानंतर सोनूनं बँक व्यवस्थापकांना एक अर्ज दिला. आपल्या खात्यात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या रकमा जमा केल्या आणि मोठ्या रकमा काढल्याचं सोनूनं अर्जाच्या माध्यमातून व्यवस्थापकांना सांगितलं.

मोठ्या रकमेचे व्यवहार ऑनलाईनसोनूनं त्याचं खातं तातडीनं बंद करण्याची आणि २३ जून २०२० पासूनच्या व्यवहाराची स्टेटमेंट्स देण्याची मागणी केली आहे. सोनूच्या खात्यातून झालेले मोठे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. बँकेतून जमा-खर्चाच्या अर्जाच्या माध्यमातून व्यवहार झालेले नाहीत.

सोनू कुमारचं खातं झीरो बॅलन्सविशेष म्हणजे ज्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाले, ते खातं झीरो बॅलन्सवर उघडण्यात आलं. सोनूनं आठवीत असताना बँक खातं उघडलं होतं. बँकेत त्यानं जे पैसे भरले, ते त्यानं काढले. त्यानं केलेला शेवटचा व्यवहार ५०० रुपयांचा आहे. सोनूनं ५०० रुपये बँकेत जमा केले. त्याचं व्याज धरुन ७०० रुपये झाले. लॉकडाऊनच्या काळात त्यानं पासबुक प्रिंट करण्यासाठी, खातं मोबाईल नंबरला लिंक करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.