माओवाद्यांची रेल्वेकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी

By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:55+5:302015-01-22T00:06:55+5:30

समस्तीपूर- माओवाद्यांनी समस्तीपूर रेल्वे मंडळाकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी कराच्या स्वरुपात केली आहे. बिहारमधील माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) या निर्बंध घातलेल्या माओवादी संघटनेच्या माओवाद्यांनी दिलेल्या या धमकीनंतर भारत-नेपाळ सीमेवरील रेल्वेमंडळाच्या विविध स्टेशन्सवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

One crore rupees for Maoists' rail and demand for arms | माओवाद्यांची रेल्वेकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी

माओवाद्यांची रेल्वेकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी

स्तीपूर- माओवाद्यांनी समस्तीपूर रेल्वे मंडळाकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी कराच्या स्वरुपात केली आहे. बिहारमधील माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) या निर्बंध घातलेल्या माओवादी संघटनेच्या माओवाद्यांनी दिलेल्या या धमकीनंतर भारत-नेपाळ सीमेवरील रेल्वेमंडळाच्या विविध स्टेशन्सवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
मंडळाचे सुरक्षा आयुक्त कुमार निशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीसी कमांडरच्या नावाने दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वे प्रबंधकांना एक पत्र मिळाले होते. त्यात एक कोटी रुपये, ५० कार्बाईन, ५० रायफल्स, ५० एसएलआर व तीन हजार काडतुसे देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास मोतीहारी, पनियहवासह अन्य रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती.
या घटनेमुळे रेल्वे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस अधिक्षकांना पत्र पाठविले असून त्यांना या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्यास सांगितले आहे. तसेच मंडळाच्या सर्व प्रमुख स्थानकांमध्ये व रेल्वे रुळांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल, सरकारी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास मोहीमही राबविली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ही कुणीतरी केलेली खोडी असावी अशी शक्यता निशांत यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: One crore rupees for Maoists' rail and demand for arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.