शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:58 IST

सर्वसामान्य माणसाला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात पण श्रीमंतांना एका झटक्यात कर्ज मिळून जातं हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण आग्र्यात एक वेगळीच घटना घडली आहे.

सर्वसामान्य माणसाला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात पण श्रीमंतांना एका झटक्यात कर्ज मिळून जातं हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण आग्र्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका मजुराच्या नावावर तब्बल १ कोटीहून अधिकचं कर्ज घेतल्याच प्रकरण उघडकीस आलं आहे. मजुराच्या नावावर बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेऊन घेऊन ८ ट्रॅक्टरसह अनेक प्रकारच्या कृषी यंत्र खरेदी करण्यात आली. संबंधित मजुराचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना कर्ज फेडीचं पत्र मिळाल्यानंतर सर्व गदारोळ उघडकीस आला. 

बँकेचं पत्र मिळताच मजुराच्या कुटुंबीयांची झोपच उडाली. याप्रकरणी कारवाईसाठी वडिलांनी सोयेत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर एजन्सीचालकाविरुद्ध फसवणुकीची तक्रारही केली आहे. मात्र ५ महिन्यांहून अधिक काळ चकरा मारूनही त्याची कोणतीही सुनावणी झालेली नाही.

ट्रॅक्टरच्या शोरुममध्ये करायचा कामजिल्ह्यातील सोयत पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीपतपुरा गावात हे विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ट्रॅक्टर एजन्सीच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या पवन या मजुराच्या नावावर बँकेकडून ८ ट्रॅक्टर, ५ थ्रेशर आणि सुमारे २ डझन इतर कृषी यंत्रांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हा तरुण सुमारे ७ वर्षांपासून या शोरूममध्ये काम करत होता. आता या मजूर तरुणाच्या वडिलांनी सोयत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर शोरूमच्या चालकांवर फसवणूक केल्याचा आरोप करत फिर्याद दिली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडून कारवाई होत नसल्याची तक्रारही त्यांनी एसपी आणि एसडीओपीकडे केली आहे.

बँक ऑफ इंडियाने कर्ज दिलेआता या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रथम एका मजुराला बँकेनं एवढं कर्ज कसं दिलं. एवढं मोठं कर्ज देणारी बँक (बँक ऑफ इंडिया) आगर जिल्ह्यापासून वेगळी असलेल्या राजगडमध्ये आहे. त्यांच्या अखत्यारीत नसताना कर्ज कसं दिलं गेलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती जमातीसाठी चालवण्यात येणाऱ्या सरकारी योजनेअंतर्गत तरुणांना हे कर्ज देण्यात आलं होतं. त्यामुळे हा सारा खेळ नियोजनबद्ध पद्धतीनं सबसिडी हडप करण्यासाठी केला गेला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

मजुराच्या वडिलांना मनस्तापसध्या मयत मजुराच्या वडिलांचे म्हणणं आहे की, कर्जात घेतलेले ट्रॅक्टर व मशिन कुठे व कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती नाही. एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच वेळी ८ ट्रॅक्टर कसे काय फायनान्स केले, हाही प्रश्न आहे. सध्या सोयत पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी