कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:19+5:302015-02-14T01:07:19+5:30
कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक

कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक
क ्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूकनागपूर : आंध्र प्रदेशातील एका कथित उद्योगपतीने संपत्ती गहाण ठेवून एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खरी माहिती कळाल्यानंतर पीडित तरुणाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी कालीडींडी सूर्यनारायण राजू (५६) रा. राजमुंद्री आंध्रप्रदेश हा आहे. फसवणूक झालेला युवक वैभव श्रीराम कुळमेथे (२५) रा. ५०१, जगत टॉवर्स, टिळकनगर, अमरावती रोड यास वारसानुसार मिळालेल्या संपत्तीच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळाली. वैभवच्या जावयाची फायनान्स कंपनी आहे. आरोपी राजूने जावयाच्या माध्यमातून वैभवशी संपर्क साधला. त्याने आपला आंध्र प्रदेशात ऊर्जा प्रकल्प असल्याची बतावणी केली. या प्रकल्पासाठी कर्ज पाहिजे असल्याचे त्याने वैभवला सांगितले. त्याने वैभवजवळ या प्रकल्पाचे बनावट कागदपत्र ठेऊन एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर काही दिवसातच वैभवला हे कागदपत्र बनावट असल्याची माहिती मिळाली. त्याने गुन्हे शाखेत या बाबत तक्रार केली. तपासानंतर शुक्रवारी अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.