शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक देश-एक निवडणूक; मतदानासाठी 30 लाख EVM ची गरज, तयारीसाठी इतके वर्ष लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 21:10 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात 'One Nation-One Election' ची चर्चा सुरू आहे.

One Nation-One Election: गेल्या काही दिवसांपासून देशात 'one nation-one election' ची चर्चा सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली आहे. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे सोपी गोष्ट नाही. निवडणूक आयोगाला यासाठी सुमारे 30 लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. निवडणुकीदरम्यान मतदान यंत्रात बिघाड झाल्यास ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी इत्यादी राखीव ठेवाव्या लागतील. यासाठी निवडणूक आयोगाला 30 लाख ईव्हीएम, 43 लाख बॅलेट पेपर आणि सुमारे 32 लाख व्हीव्हीपीएटी लागणार आहेत. ईव्हीएम मशीनसाठी बॅलेट युनिट, व्हीव्हीपीएटी आवश्यक असतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर निवडणूक आयोगाकडे सध्या सुमारे 35 लाख मतदान युनिट्स (EVM, बॅलेट पेपर आणि VVPAT) ची कमतरता आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबतच्या अहवालावर काम करणाऱ्या विधी आयोगाने काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाशी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या गरजा आणि आव्हानांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने कायदा आयोगाला सांगितले होते की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यासाठी पुरेशा सुविधांचीही गरज आहे.

ईव्हीएमचे शेल्फ लाइफ 15 वर्षे ईव्हीएमचे शेल्फ लाइफ 15 वर्षे असते. मात्र, या मतदान केंद्रांच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पूर्वीच्या खरेदी दरांवरुन, एक कोटी युनिट्सची एकूण किंमत 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये व्हीव्हीपीएटी युनिट्ससाठी 6,500 कोटी रुपयांहून अधिकचा समावेश आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या तर खर्चही जास्त होऊ शकतो.

माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील “एक राष्ट्र, एक निवडणूक” या विषयावरील उच्चस्तरीय समितीने लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली आहे. निवडणूक आयोगाने कायदा आयोगाशी केलेल्या चर्चेत ईव्हीएमसाठी अधिक स्टोरेज सुविधांची गरज, यासारख्या आव्हानांचीही यादी केली आहे. वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी सेमीकंडक्टर उद्योगही स्थिर असला पाहिजे. सध्या सर्व शक्यतांवर विचार केला जात आहे. यावर लवकरच तोडगा निघून वन नेशन वन इलेक्शनबाबत ठोस निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभा