60 बळी घेणा-या दिल्ली स्फोटात एक दोषी, दोघांची सुटका
By Admin | Updated: February 16, 2017 17:18 IST2017-02-16T17:18:25+5:302017-02-16T17:18:25+5:30
दिल्लीमध्ये 16 फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने तारीक अहमद दारला दोषी ठरवले.

60 बळी घेणा-या दिल्ली स्फोटात एक दोषी, दोघांची सुटका
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - दिल्लीमध्ये 16 फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने तारीक अहमद दारला दोषी ठरवले. अन्य दोन आरोपी मोम्मद रफीक शहा आणि मोहम्मद हुसेन फाझीली यांची सर्व आरोपातून सुटका केली. 12 वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात 60 जण ठार झाले होते.
दारला ढाक्यामध्ये अटक झाली होती. त्यानंतर 2005 च्या दिल्ली बॉम्बस्फोटा प्रकरणी 2007 मध्ये त्याला भारतात आणण्यात आले. त्याचे लष्कर-ए-तय्यबाशी संबंध होते. दिल्ली पोलिस त्याच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने तीस हजारी कोर्टाने त्याची सुटकाही केली होती.
त्यानंतर फोन कॉल्स डिटेलच्या आधारावर तो लष्करच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. सरोजिनी नगर मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 50 जण ठार झाले होते. पहाडगंज आणि कालकाजी इथेही त्याचदिवशी बॉम्बस्फोट झाले होते. कारस्थान रचणे, युध्द पुकारणे, शस्त्र गोळा करणे, हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते.