दीड वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:33+5:302015-07-12T23:56:33+5:30
नाशिक : सर्पदंशाने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे़ या मुलीचे नाव दिपू रेरे असे आहे. ती अवरखेड येथील रहिवासी आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, आई-वडिलांसमवेत झोपलेली असताना शनिवारी (दि़११) रात्री दोनच्या सुमारास तिला साप चावला़ यानंतर तिला वडील पिंटू रेरे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ भोये यांनी घोषित केले़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

दीड वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
न शिक : सर्पदंशाने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे़ या मुलीचे नाव दिपू रेरे असे आहे. ती अवरखेड येथील रहिवासी आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, आई-वडिलांसमवेत झोपलेली असताना शनिवारी (दि़११) रात्री दोनच्या सुमारास तिला साप चावला़ यानंतर तिला वडील पिंटू रेरे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ भोये यांनी घोषित केले़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)