दीड लाख शिवभक्तांनी घेतले दर्शन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:23+5:302015-02-18T00:13:23+5:30

बनेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

One and a half lakh devotees have taken Darshan | दीड लाख शिवभक्तांनी घेतले दर्शन

दीड लाख शिवभक्तांनी घेतले दर्शन

ेश्वरला भाविकांची अलोट गर्दी
नसरापूर : महाराष्ट्रातील शिवभक्तांचे तीर्थस्थान श्री बनेश्वर येथे यावर्षी सुमारे दीड लाखपेक्षा अधिक भाविकांनी श्री महादेवाचे दर्शन घेतले. रात्री साडेबारानंतर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
पहाटे शासकीय पूजा भोरचे प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या हस्ते पार पडली. तर ट्रस्टच्या वतीने अनिल कदम यांनी सपत्नीक पूजा केली. या वेळी त्यांच्यासह भोरचे तहसीलदार राम चोबे, मंडलाधिकारी रमेश सोनवणे, श्रीबनेश्वर महादेव ट्रस्टचे काशिनाथ पालकर उपस्थित होते.
राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वत्र बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथक आणि ॲम्ब्युलन्सची सोय केली होती.
नसरापूर येथील राजतोरण प्रतिष्ठानतर्फे एसटी स्थानकाजवळ थंड पाण्याची सोय केली होती. नसरापूर प्राथमिक आरोग्य विभागाच्या पथकाने पाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था राबवून यात्रेतील प्रत्येक दुकानातील पाण्याची तपासणी केली.

फोटो - वैभव भुतकर, नसरापूर

(संपादन : बापू बैलकर)

Web Title: One and a half lakh devotees have taken Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.