शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींशी लग्न करणारे रडारवर, आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 07:14 IST

Assam News: येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे.

गुवाहाटी : येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मग संबंध ठेवणारा मुलीचा कायदेशीर पती असला तरीही! असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एका सरकारी कार्यक्रमात म्हणाले. मुलीच्या विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे असून, कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. ‘अनेकांना (अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्यांना) जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते,’ असेही ते म्हणाले.

अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बालविवाह आणि अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्याप्रतिच्या आपल्या सरकारच्या बांधिलकीचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (वृत्तसंस्था) 

योग्य वयात लग्नही करामातृत्त्वाविषयी बोलताना सरमा म्हणाले, “आम्ही अल्पवयीन मातृत्त्वाच्या विरोधात बोलत आहोत. परंतु, त्याचवेळी स्त्रियांनी आई होण्यासाठी जास्त वेळ थांबू नये. कारण, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. देवाने आपले शरीर अशा प्रकारे तयार केले आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वय आहे. मातृत्त्वासाठी योग्य वय २२ ते ३० वर्षे आहे. ज्या महिलांनी अद्याप लग्न केलेले नाही, त्यांनी लवकर करावे, असेही ते हसत हसत म्हणाले.

टॅग्स :Assamआसामmarriageलग्न