शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! होळीदिवशी तरुणीला विवस्त्रावस्थेत गावातून फिरवले, बेदम मारले, ४ महिला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:58 IST

Madhya Crime News: एका गावामध्ये होळीच्या दिवशी एका ३० वर्षीय तरुणीला काही महिलांनी बेदम मारहाण केल्याची आणि तिला विवस्त्र करून गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एका गावामध्ये होळीच्या दिवशी एका ३० वर्षीय तरुणीला काही महिलांनी बेदम मारहाण केल्याची आणि तिला विवस्त्र करून गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी कठोर कारवाई करत या तरुणीला मारहाण करून विवस्त्रावस्थेत फिरवल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे होळीदिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओसुद्धा बनवण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. याबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार पोलीस एसपी (ग्रामीण) सुनील कुमार मेहता यांनी सांगितले की, गौतमपुरा पोलीस ठाणे परिसरामधील एका गावामध्ये चार महिलांनी मिळून एका तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर तिला जबर मारहाण केली. 

या महिल्या एवढ्यावरच थांबल्याय नाहीत. त्यांनी त्या तरुणीला विवस्त्र केले. तसेच त्याच अवस्थेत तिला गावभर फिरवले. या तरुणीची विवस्त्रावस्थेत धिंड काढली जात असताना कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला. दरम्यान, या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटल्यानंतर आता आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकारामुळे धक्का बसलेली पीडित तरुणी गाव सोडून तिच्या पालकांकडे गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडिता दोघेही अनुसूचित जातींमधील आहेत. घडलेली घटना गावातीलच कुणीतरी मोबाईलवर चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केली. पोलीस आता या घटनेचं चित्रिकरण करणाऱ्याचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी