शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या भावाच्या निधनाची बातमी कळताच घरी निघालेल्या मोठ्या भावाचाही वाटेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:23 IST

दिलीपच्या निधनाचं वृत्त घरच्यांना कळताच कुटुंबात शोक पसरला. घरच्यांनी या घटनेची माहिती कानपूरमध्ये राहणाऱ्या उमाशंकर गौंड या भावाला दिली

देवरिया - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात काही तासांमध्ये २ सख्या भावांचा वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. छोटा भाऊ दुचाकीवरून निमंत्रण पत्रिका देऊन घरी परतत होता. तेव्हा बिहारच्या जीरदोई इथं रस्ते अपघातात त्याचा जीव गेला. ही बातमी कानपूरमध्ये मोठ्या भावाला कळाली. त्यानंतर तो कारमधून देवरियासाठी निघाला होता.  छोट्या भावाच्या निधनाचं वृत्त समजताच मोठा भाऊ कानपूरहून देवरिया इथं घरी चालला असताना रस्त्यात त्याच्या कारचे टायर फुटले.

त्यामुळे कार अनियंत्रित झाली. या दुर्घटनेत मोठ्या भावाचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी या दोन सख्या भावांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेने गावकऱ्यांमध्येही शोककळा पसरली. बातमी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर गावातील दिवंगत भगिरथी गौंड यांना ५ मुले आहेत. त्यात रमाशंकर गौंड, उमाशंकर गौंड, गौरी गौंड, सीताराम गौंड आणि दिलीप गौंड यांचा समावेश आहे. मंगळवारी दिलीप गौंड गावातील मित्र रामकेवल शर्मासोबत दुचाकीवरून बिहार राज्यातील जीरदोई इथं निमंत्रण पत्रिका द्यायला गेला होता. रात्री उशिरा हे दोघे घरी परतताना विजयीपूर चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्याठिकाणी दिलीपला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दिलीपसोबतच्या मित्रांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. 

दिलीपच्या निधनाचं वृत्त घरच्यांना कळताच कुटुंबात शोक पसरला. घरच्यांनी या घटनेची माहिती कानपूरमध्ये राहणाऱ्या उमाशंकर गौंड या भावाला दिली. त्याच रात्री उमाशंकर त्याच्या कुटुंबासह कारमधून देवरिया येथील घरी निघाला. परंतु ईश्वराच्या मनात भलतेच काही होते. उमाशंकर उन्नाव इथं पोहचला तेव्हा त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याशेजारील खड्ड्यात पडली. 

या अपघातात उमाशंकर गौंड यांचा मृत्यू झाला तर जखमी पत्नीला कानपूरच्या रुग्णालयात भरती केले आहे. या घटनेत ड्रायव्हरचा दुखापत झाली आहे. उमाशंकरच्या मृतदेहाचं कानपूरमध्ये पोस्टमोर्टम करण्यात आले. कुटुंबाने तिथेच अंत्यसंस्कार केले. तर बुधवारी रात्री दिलीपवरही कुटुंबाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व भावांमध्ये उमाशंकर हा दुसऱ्या नंबरचा होता. तो कानपूर इथं नोकरी करायचा. निवृत्तीनंतर तो तिथेच राहत होता. तर दिलीप गौंड सर्वात छोटा होता. देवरिया गावात तो मिठाई बनवण्याचं काम करत होता. त्यांच्या मुलीचं पुढील वर्षी लग्न होते. २ भावांच्या आकस्मित जाण्यानं कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. गावातील सर्व लोकांमध्ये या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश