शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:35 IST

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार, वयाची 18 वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत येईल.

18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव टाकरण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. पण, जर तुमचे नाव मतदार यादीत आपोआप आले तर? हे सध्या शक्य नाही, परंतु लवकरच होऊ शकते. केंद्र सरकार असे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत नाव टाकले जाईल. एवढंच नाही तर एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे नाव मतदार यादीतून आपोआप काढून टाकले जाईल.

विधेयकात काय असेल ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जनगणना इमारतीचे उद्घाटन करताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सरकार संसदेत एक विधेयक आणणार आहे, ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी मतदार यादीशी जोडण्याची तरतूद असेल. अमित शाह म्हणाले, 'मतदार यादीशी मृत्यू आणि जन्म नोंदणी जोडण्यासाठी विधेयक आणले जाईल. या अंतर्गत एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत जोडले होईल. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल.'

लायसन्स-पासपोर्ट मिळणेही सोपे होणार जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले जाईल. हे विधेयक आल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट देण्यापासून इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी अतिशय सोयीस्कर होतील. जन्म-मृत्यूचे दाखले नीट जतन केले, तर जनगणनेच्या मध्यावरच सर्वांगीण विकासाचे नियोजन करणे सोपे जाईल.

हे सगळं कसं होणार?गेल्या वर्षी अमित शहा म्हणाले होते की, पुढील जनगणना पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. ती 100% अचूक असेल आणि पुढील 25 वर्षांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. ई-जनगणनेसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल. मोबाईल अॅप्लिकेशनही तयार होईल. याच्या मदतीने लोक घरी बसून त्यांचा डेटा अपडेट करू शकतील. जन्मापासून मृत्यूपर्यंतची तारीख जनगणनेशी जोडली जाईल. मुलाच्या जन्मासोबतच त्याची तारीखही जनगणना कार्यालयात नोंदवली जाईल. तो 18 वर्षांचा झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल आणि त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा डेटा आपोआप हटवला जाईल.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार