शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 11:53 IST

एनडीएचा घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लखनौ -  एनडीएचा घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांना मंत्रिमंडळातून तत्काळ प्रभावाने बरखास्त करावे, अशी शिफारस राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यापालांनी राजभर यांना पदमुक्त केले. दरम्यान, राजभर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच उत्तर प्रदेशात गरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदावर असलेले राजभर यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून भाजपाला वारंवार अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्यामुळे अखेर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजभर यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफासर केल्यानंतर राज्यपालांनी या शिफारशीच मंजुरी दिली आहे. दरम्यान, '' मी माझ्या पदाचा आधीच राजीनामा दिला होता. आता त्यांच्या मनात जे आहे ते त्यांना करू द्या. मी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावी असे ते सांगत होते. असे केले असते तर आमच्या पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले असते. जो विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तोच संपुष्टात आला असता.'' असे राजभर यांनी म्हटले आहे.  ओमप्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीत घोसीसह एकूण दोन जागांची मागणी केली होती. भाजपाने त्यांना घोसी येथून तिकीट देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र राजभर यांनी भाजपाच्या तिकीटावर लढावे, अशी अट घालण्यात आली. मात्र त्याबाबत राजभर यांनी नकार दिला होता. तसेच उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात 39 उमेदवारा उतरवण्याची घोषणा केली होती. तसेच सातव्या टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होईल, तसेच सपा-बसपा आघाडीला विजय मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले होते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Politicsराजकारण