शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Omicron Variant : 'ओमायक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी'; शॉपिंगचा धडकी भरवणारा Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:42 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. लोकांना कोरोनाची चिंताच नसून नियमांचीही अजिबात भीती नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिल्लीतील प्रसिद्ध मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. 

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे ओमाय़क्रॉनने टेन्शन वाढवलेलं असताना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. मास्क न लावता लोकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली आहे. दिल्लीतील मार्केटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील (Delhi) सरोजनी नगर मार्केटमधील (Sarojini Nagar Market)  हा व्हिडीओ आहे.

ना कोरोनाची चिंता, ना नियमांची भीती! निर्बंधांची एैशीतैशी

"ओमायक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी" असं कॅप्शन देखील शर्मा यांनी या व्हिडिओला दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये लोकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. कपड्यांची दुकानं पाहायला मिळत असून लोक एकमेकांना धक्का मारून खरेदी करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनने भीतीचे वातावरण निर्माण केलेले असताना लोकांचा हा हलगर्जीपणा समोर आला आहे. व्हिडिओत दिसणारी इतकी गर्दी पाहून सर्वांनाच भीती वाटू लागली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ओमायक्रॉनचा भयावह वेग! देशातील रुग्णसंख्या 216 वर; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवलं टेन्शन

दिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडेवारी ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच आता देशातील एकूण रुग्णसंख्या ही 216 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे जवळपास अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे 57 तर महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. आतापर्यंत 90 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तेलंगणामध्ये ओमायक्रॉनचे 24, कर्नाटकमध्ये 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15, गुजरातमध्ये 14, जम्मू-काश्मीरमध्ये 3, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये 2-2 रुग्ण आढळले आहेत तसेच आंध्र प्रदेश, चंडीगड, लडाख, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली