शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Omicron in India: गेल्या 24 तासांत 9,195 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 781वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 11:04 IST

Omicron in India: गेल्या 24 तासांत 302 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात 77 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली: आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. भारतातही दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत भारतातील अनेक राज्यात ओमायक्रॉनची प्रकरणे आढळत असून, रुग्णसंख्या 781 वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या 24 तासांत देशात 9 हजार 195 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 302 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात 77 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवीन आकडेवारीसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 48 लाख 8 हजार 886 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 4 लाख 80 हजार 592 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रशासित प्रदेशात ओमायक्रॉन दाखल

नवीन आकडेवारीनुसार, 781 ओमायक्रॉन रुग्णांपैकी 241 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक 238 रुग्ण असून, महाराष्ट्रात 167 रुग्ण आहेत. आतापर्यंत देशभरातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहे. अलीकडेच मणिपूर, लडाख, हिमाचल प्रदेश, गोवा येथेही पहिला रुग्ण आढळून आलाय.

महाराष्ट्रातील आकडेवारीमंगळवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 2,172 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 66,61,486 झाली आहे, तर आणखी 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,41,476 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हायरसचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 167 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.

दिल्लीतील परिस्थितीमंगळवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 496 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, 4 जूनपासून एका दिवसात नोंदलेली सर्वाधिक संख्या आहे. राजधानीत, गेल्या 24 तासांत महामारीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर संसर्ग दर 0.89 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 14,44,179 प्रकरणे समोर आली आहेत.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या