वृद्धेचा पाण्यात पडून मृत्यू
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
कोरेगाव भीमा : येथे भीम नदीत एका ७० वर्षीय अनोळखी वृद्धेचा पाण्यात पडून मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दि. ३० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पुलावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

वृद्धेचा पाण्यात पडून मृत्यू
क रेगाव भीमा : येथे भीम नदीत एका ७० वर्षीय अनोळखी वृद्धेचा पाण्यात पडून मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दि. ३० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पुलावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या दरम्यान कोरेगाव भीमा हद्दीत दशक्रिया घाटाजवळ भीमा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. अंदाजे ७० वर्षे वयोगटातील व साडेचार फूट उंचीच्या या वृद्ध महिलेच्या अंगावर नऊवारी साडी, लालसर ब्लाऊज असून कानात कर्णफुले, गळ्यात काळ्या मण्यांची माळ, हातात बांगड्या, असा पेहराव आहे. अद्याप या वृद्धेची ओळख पटलेली नसून ती नदीत पडली की तिने आत्महत्या केली, याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हेडकाँस्टेबल अनिल कोळेकर तपास करत आहेत.