वृद्ध, निराधारांची निदर्शने

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

फोटो - स्कॅन

Older, demonstrations of underdogs | वृद्ध, निराधारांची निदर्शने

वृद्ध, निराधारांची निदर्शने

टो - स्कॅन
नागपूर : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील विधवा, अपंग, वृद्ध, निराधारांना दरमहा ६०० रुपये मिळणारी पेन्शन ३००० करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक मंडळ मध्य नागपूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून निराधार वृद्धांना नियमित मिळणारी पेन्शन बंद झाली आहे. अशा वृद्धांची पेन्शन त्वरित सुरू करावी, तीन महिन्यातून एकवेळा मिळणारी पेन्शन दर महिन्याला मिळावी, गेल्या ८ महिन्यापासून एपीएल कार्डधारकांना रेशनकार्डवर धान्य वाटप बंद करण्यात आले आहे. अशा एपीएल कार्डधारकांना रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप सुरू करावे, या मागण्यांसाठी निदर्शने करून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात मनोहर खर्चे, वासुदेव वाकोडीकर, डॉ. रमेश थोरात, विजय भगतकर, वामन हेडाऊ, गंगाराम रामटेककर, नारायण पाठराबे, जनार्दन खापेकर, प्रल्हाद निखारे, कोलबाजी टोपरे आदी उपस्थित होते.

Web Title: Older, demonstrations of underdogs