वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:28+5:302015-01-31T00:34:28+5:30
वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले

वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले
व द्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटलेझिंगाबाई टाकळीतील घटना : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणनागपूर : बाथरुमच्या दरवाज्याला छिद्र पाडून आत प्रवेश केलेल्या आरोपींनी वृद्ध प्रॉपर्टी डीलर आणि त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे एक लाखाचे दागिने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरात घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.प्रकाश चंद्रिकापुरे (५८) हे गीतानगरात राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि सून राहतात. गुरुवारी रात्री चंद्रिकापुरे आणि त्यांची पत्नी घरी होते. त्यांचा मुलगा कामानिमित्त बल्लारशाला गेला होता तर सून माहेरी गेली होती. रात्री १ ते २.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी बाथरुमच्या दरवाज्याला कटरच्या साहाय्याने छिद्र पाडले. छिद्रातून तार टाकून दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर त्यांनी घरात आत प्रवेश केला. सुरुवातीला चोरट्यांनी घरातील दागिने शोधले. परंतु त्यांना काहीच आढळले नसल्याने ते चंद्रिकापुरे यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांचा गोंधळ ऐकून चंद्रिकापुरे दाम्पत्याला जाग आली. आरोपींनी त्यांना शस्त्र दाखवून दागिने काढण्यास सांगितले. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चंद्रिकापुरे यांनी आठवडाभरापूर्वीच सोन्याची चेन तयार केली होती. त्यांनी चेन, अंगठी, पत्नीचे मंगळसूत्र, टॉप्स आरोपींना दिले. आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या चंद्रिकापुरे दाम्पत्याने काही वेळानंतर शेजारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. गिट्टीखदानचे रात्रपाळी अधिकारी के. डी. भगत आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी बाईकवर आले असल्याने त्यांचा सुगावा लागला नाही. चंद्रिकापुरे प्रॉपर्टी डीलर असल्याचे तसेच त्यांचा परिवार बाहेरगावी गेल्याची माहिती आरोपींना असल्याची पोलिसांना शंका आहे.................