पिंप्राळ्यातील वृद्ध बेपत्ता
By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST
जळगाव : पिंप्राळा उपनगरातील कुंभारवाडा भागात राहणारे विकास श्रीकृष्ण वाणी (वय ६०) हे २२ जानेवारी २०१६ पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. दाढी करण्यासाठी जात असल्याने सांगून ते घरून बाहेर पडलेले होते. मात्र, ते अजूनही घरी परतलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. ते सुधीर कमलाकर वाणी (रा.हरेश्वरनगर, रिंगरोड, जळगाव) यांचे मेहुणे आहेत.
पिंप्राळ्यातील वृद्ध बेपत्ता
जळगाव : पिंप्राळा उपनगरातील कुंभारवाडा भागात राहणारे विकास श्रीकृष्ण वाणी (वय ६०) हे २२ जानेवारी २०१६ पासून अचानक बेपत्ता झाले आहेत. दाढी करण्यासाठी जात असल्याने सांगून ते घरून बाहेर पडलेले होते. मात्र, ते अजूनही घरी परतलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. ते सुधीर कमलाकर वाणी (रा.हरेश्वरनगर, रिंगरोड, जळगाव) यांचे मेहुणे आहेत.प्लॉटच्या व्यवहारात एकाची फसवणूकजळगाव- प्लॉटच्या व्यवहारात पाच जणांनी संगनमताने फसवणूक केल्याची तक्रार त्र्यंबक गंगाधर धोटे (रा.लिम्पस क्लब, भुसावळ) यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अजय रामदास पाटील (४९, रा.भुसावळ), अनिता संतोष निळे (३७, रा.साकळी, ता.यावल), शोभा दिगंबरराव चौधरी (४९,रा.भुसावळ), जयश्री शालिग्राम न्याती (६०, रा.भुसावळ) व संगीता वसंत उगले (६७, रा.भुसावळ) यांनी प्लॉटच्या व्यवहारात फसवणूक केली. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.बसस्थानकात सुविधा पुरवण्याची मागणीजळगाव- शहरातील नवीन बसस्थानकात पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी जळगाव शहर कॉँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी केली आहे. बसस्थानक परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. जळगाव विभागातील विविध डेपो व इतर विभागातून या बसस्थानकात अनेक बसेस येतात. या ठिकाणी प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.