शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video: जुन्या नोटांचं घबाड,  यूपीत 3 गाद्यांमध्ये सापडल्या 100 कोटींच्या जुन्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 14:14 IST

तब्बल 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्याने खळबळ, नोटा गाद्यांमध्ये लपवून ठेवल्या होत्या

कानपूर:  नोटबंदीच्या 14 महिन्यांनंतरही जुन्या नोटा सापडण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीये. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा पकडण्यात आल्या आहेत. येथे तब्बल 80 ते 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. नोटा मोजण्याचं काम सुरू आहे.  विशेष म्हणजे, या नोटा गाद्यांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात आनंद खत्री नावाचा मुख्य आरोपी आहे. टक्केवारीवर नफा घेवून तो नोटा बदलून द्यायचा. पोलीस आणि एनआयएच्या पथकाने मंगळवारी 3 ते  4 हॉटेल्स आणि बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरात  छापेमारी केली. यावेळी  स्वरूप नगर परिसरातील एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या.  घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन गाद्यांमध्ये लपवण्यात आलेल्या 500 - 1000 च्या जुन्या नोटा पाहून पोलिसही अवाक झाले. या प्रकरणी 16 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामागे जुन्या नोटा बदलून देणारं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचं कनेक्शन दहशतवादी संघटनाशी जोडण्यास पोलिसांनी नकार दिला. आरोपी आनंद खत्री श्रीमंत घरातील आहे. तो 20 ते 25 टक्के नफा घेऊन तो या नोटा बदलून देतो असं लोकांना सांगायचा. पण त्याला ज्या ठिकाणाहून नोटा बदलवायच्या होत्या त्यामध्ये अपयश आल्याने घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा जमा होत गेल्या. कानपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ -

    

टॅग्स :Note BanनोटाबंदीUttar Pradeshउत्तर प्रदेश