काश्मिरातील पुराने तोडल्या धर्माच्या भिंती

By Admin | Updated: September 15, 2014 04:29 IST2014-09-15T04:29:36+5:302014-09-15T04:29:36+5:30

जम्मू काश्मिरातील महापुरामुळे असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झालीत़ अपरिमित हानी झाली पण सोबतच जाती धर्माच्या भिंतीही उद्ध्वस्त झाल्यात़

Old broken walls of religion in Kashmir | काश्मिरातील पुराने तोडल्या धर्माच्या भिंती

काश्मिरातील पुराने तोडल्या धर्माच्या भिंती

श्रीनगर/अमृतसर : जम्मू काश्मिरातील महापुरामुळे असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झालीत़ अपरिमित हानी झाली पण सोबतच जाती धर्माच्या भिंतीही उद्ध्वस्त झाल्यात़ नैसर्गिक प्रकोपात अनेक धर्माचे लोक एकमेकांना आश्रय आणि धीर देताना दिसत आहेत़ देशभरातून काश्मिरी नागरिकांसाठी मदत येत आहे. शीख धर्मियांचे सर्वोच्च धर्मपीठ असलेल्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या वतीने ५0 हजार अन्न पाकिटे जम्मू-काश्मीरसाठी रवाना करण्यात आली आहेत.
श्रीनगर शहरातील वजीरबाग भागातील पुरातून बचावलेला १५ वर्षीय अब्दुन रहमान आपल्या कुटुंबासोबत एका गुरुद्वारात राहत आहे़ लंगरमध्ये जेवतो आहे़ या गुरुद्वारापासून काही मीटर अंतरावरील एका मशिदीतही मदत शिबीर लावण्यात आले आहे़ याठिकाणी विविध जातीधर्माचे सुमारे ५०० जण आश्रय घेऊन आहेत़ जम्मू काश्मिरातील नैसर्गिक संकट भीषण आहेत़ पण यातही जातधर्म न विचारता एकमेकांना मदत देणारे हात आणि धीर देणारे शब्द असे हे चित्र सुखावणारे आहे़ जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी अमृतसर येथून खाद्यान्नाची सुमारे ५० हजार पाकिटे विमानातून पाठविण्यात आली. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या वतीने ही पाकिटे वेगवेगळ््या गुरुद्वारांत व जवळपासच्या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. काही पाकिटे येथील सुवर्णमंदिरातही तयार करण्यात आली. एसजीपीसीने शुक्रवारीही २५ हजार पाकिटे पाठविली होती. ही पाकिटे जम्मू आणि काश्मीर सरकार आणि लष्कराने विनंती केल्यानंतर पाठविली गेली. गेल्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीरच्या मोठ्या भागाला पुराचा फटका बसला.

Web Title: Old broken walls of religion in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.